Orange alert issued by IMD in Goa  Dainik Gomantak
गोवा

जाणून घ्या, कधी होतो जाहीर ऑरेंज अलर्ट

ऑरेंज अलर्ट जारी केला जातो, जेणेकरून नागरिकांना व शासनाला योग्य ती पावले उचलणे शक्‍य होईल.

दैनिक गोमन्तक

गोवा: ज्यावेळी सतत दोन-तीन तास 110 मिलिमीटर किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस बरसतो, त्यावेळी यलो अलर्टऐवजी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो, जेणेकरून नागरिकांना व शासनाला योग्य ती पावले उचलणे शक्‍य होईल. तसेच ज्यावेळी मोठ्या प्रमाणात 200 मिलिमीटर किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस कोसळतो, तेव्‍हा याच ऑरेंज अलर्टचे रूपांतर रेड अलर्टमध्ये करण्यात येते.

(Find out when the Orange Alert is released)

सतर्कतेचा इशारा

या अलर्टदरम्यान प्रभावित क्षेत्रातील लोकांना घराबाहेर काढण्याचे नियोजन करून ठेवावे लागते. तसेच शासनाला देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतो. ज्यावेळी ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळी भीतीचे कोणतेही कारण नसले तरी जर अधिक प्रमाणात पाऊस पडला तर त्यासाठी तयारीत रहा असा इशारा देण्यात येतो.

ज्यावेळी मान्सूनला सुरुवात होते व सतत दोन ते तीन दिवस 110 मिलिमीटर किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस पडतो, त्यावेळी ऑरेंज अलर्ट दिला जातो. त्याद्वारे नागरिक व सरकारला सतर्क केले जाते.

- एम. राहुल, वैज्ञानिक , (पणजी वेधशाळा)

म्हापशात दिवसभर पावसाची रिपरिप

म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यात पावसाचा जोर हळूहळू वाढत असून आज सोमवारीही शहरात पावसाची रिपरिप सुरुच होती. मागील, तीन-चार दिवसांपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी पडत होत्‍या. शहरवासीयांची सोमवारची सकाळी पावसाच्या सरींनी उजाडली. दिवसभर हलक्या सरी, तर कधी उघडीप असा अनुभव नागरिकांनी घेतला. शहरात पावसाच्या सरी पहाटेपासून दुपारपर्यंत सुरु होत्या. एक वाजेनंतर पावसाचा वर्षाव थांबला. मात्र, ढगाळ हवामान कायम होते. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा हलक्या व मध्यम सरी कोसळू लागल्या होत्या. तर सहा वाजल्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT