Goa IIT News  Dainik Gomantak
गोवा

अखेर गोव्यात 'आयआयटी'चा मार्ग मोकळा

काणकोणची जागा निश्‍चित: जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे संकेत

दैनिक गोमन्तक

काणकोण: केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या आयआयटी गोवा’चा मार्ग मोकळा झाला असून आयआयटी काणकोणमध्येच उभारली जाण्याचे संकेत आज मुख्यमंत्र्यांनी काणकोण येथील जाहीर सभेत दिले.

काणकोण नागरिक समिती आणि भाजप काणकोण मंडळातर्फे आयोजित विजय संकल्पपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जिरेटोप व तलवार देऊन गौरव केला. यावेळी सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दाजी साळकर, उल्हास तुयेकर, गणेश गावकर, मंत्री सुभाष फळदेसाई, संतोबा देसाई, सायमन रिबेलो, चेतन देसाई आणि मान्यवर उपस्थित होते.

काणकोणात शैक्षणिक प्रकल्प आणण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य प्रकल्पही काणकोणात उभारण्यात येतील. काणकोण स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्या मागे ठामपणे उभे आहे. तवडकर फक्त संकल्प करून थांबत नाहीत, तर त्यांची पूर्तता करतात.

त्यामुळेच दोन बेघर रहिवाशांना घरे बांधून देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. काणकोणातील बेरोजगार युवकांचे कौशल्य विकसित करून त्यांना रोजगारक्षम करणार आहेत. काणकोणमधील वनाचे दावे निकालात काढण्यात येणार आहे. कोणत्या जातीत जन्माला येणे, हे कोणाच्या हातात नसते. मात्र, ज्या जातीत जन्माला आला, त्या जातीचा उद्धार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

यावेळी आमदार साळकर, तुयेकर, गावकर, मंत्री फळदेसाई यांनी सत्काराला उत्तर दिले. तानावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. विशाल देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी भाजपचे सचिव सर्वानंद भगत, महिला मोर्चा अध्यक्षा विंदा सतरकर, दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष महेश नाईक, माजी सरपंच शाबा नाईक गावकर, संजीव तिळवे, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, माजी जिल्हा पंचायत सदस्य डॉ. पुष्पा अय्या आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची मान ताठ राहु दे

सभापतिपद मिळाले, पण मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. मलाही थोडी खंत होती. मात्र, सकारात्मक विचार करून सभापतिपदाचा योग्य वापर करण्याचे ठरविले. त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली. मला कोणतीच आशा नाही. फक्त कार्यकर्त्यांची मान ताठ राहु दे, असे तवडकर यावेळी म्हणाले.

काणकोण बनणार शैक्षणिक हब

गेल्या वर्षभरापासून आयआयटीच्या जागेचा शोध सुरू आहे. मेळावलीवासीयांच्या विरोधाला बळी पडलेला हा प्रकल्प आता काणकोणमध्ये होणार असून तशी काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांची मागणी आहे. काणकोणला शैक्षणिक हब बनवण्यास रमेश तवडकर आग्रही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT