Pet Dog Dainik Gomantak
गोवा

Pet Dog: अखेर कोलव्यातील ‘तो’ कुत्रा दगावला

Pet Dog: कोलव्यात एका कुत्र्याला हाकलण्यासाठी त्याच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा संतापजनक प्रकार घडला होता.

दैनिक गोमन्तक

Pet Dog: कोलव्यात एका कुत्र्याला हाकलण्यासाठी त्याच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. होरपळल्याने उपचारावेळी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार तो कुत्रा येथील एका रेस्टारंट मध्ये वारंवार येत असल्याने संतापलेल्या एकाने उकळते पाणी ओतले होते.

जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बाँबचा स्फोट होऊन एका रानटी डुकराचे तोंड फुटल्याची घटना ताजी असतानाच कोलवा येथील एका पाळीव कुत्र्यावर अज्ञाताने उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे कुत्रा भाजून गंभीर जखमी झाला असून त्याच्या अंगावरील चामडी अक्षरशः लोंबकळत आहे. या अमानुष कृत्य करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध कोलवा परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत पाळीव कुत्र्यावर गरम पाणी ओतण्याचा हा प्रकार घडला होता. या प्रकरणी फिडोल नामक महिलेने कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कुत्र्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. प्राणिमित्रांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्राण्यांवरील हल्ले निंदनीय

साकोर्डा - धारबांदोडा येथे शिकारीसाठी पेरलेल्या गावठी बाँबच्या स्फोटात काल रानडुक्कराचे तोंड फुटून जखमी होण्याची घटना घडली होती. त्यानंतर आज कोलवा येथे पाळीव कुत्र्यावर उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्राणीप्रेमींत हळहळ व्यक्त केली जात आहे. माणसाकडून पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांवर होणारे हे हल्ले निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT