Lok sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या कामाचे सादरीकरण

Lok sabha Election: तयारी लोकसभेची: मुख्य निवडणूक उपायुक्तांकडून सूचनाही
Lok sabha Election
Lok sabha ElectionDainik Gomantak

Lok sabha Election: देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तयारीला वेग दिला आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे उपायुक्त धर्मेंद्र शर्मा गोवा भेटीवर असून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून चालू असलेल्या कामांची पाहणी करत आहेत. यावेळी निवडणुक कामाचे सादरीकरण करण्यात आले.

Lok sabha Election
Pernem: लढ्यासाठी एकत्र येणे गरजेचे; जीत आरोलकर

राज्यात सध्या मतदारांची विशेष सारांश उजळणी सुरू आहे. यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, कायदा व सुव्यवस्था आणि तयारीशी संबंधित इतर विषयांवर चर्चा आणि पाहणी करत आहेत. शर्मा यांच्यासोबत उपायुक्त आर. के. गुप्ता आणि वरिष्ठ प्रधान सचिव नरेंद्र बुटोलिया गोवा भेटीवर आले असून शर्मा आणि इतर केंद्रीय निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते. शर्मा यांनी अधिकाऱ्यांना सर्वांसाठी एक मजबूत प्रशिक्षण यंत्रणा असावी, असे सुचवले.

‘ई-रोल’वर चर्चा

राज्य ‘ई-रोल’ शुद्ध करण्यासह कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि मागण्यांवरही त्यांनी चर्चा केली. राज्य पोलिस नोडल अधिकारी विशेषत: केंद्रीय दलांच्या मागण्यांच्या संदर्भात आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचे सादरीकरणही दाखवण्यात आले. राज्यातील दोन्ही मतदारसंघातील निवडणूक निःपक्षपाती आणि आयोगाच्या कायदेशीर चौकटीत राहून योग्य रीतीने पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, अशा त्यांनी सूचना केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com