Margao  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : अखेर फरार योगेश शेटकर विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस ; पोलिसांना झुकांडी

Goa Crime News : १७ लाखांची अफरातफर; मडगाव पालिकेचा आदेश धाब्यावर

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव फेस्‍त फेरीच्‍या सोपो करातून आलेली १७ लाखांची रक्‍कम पालिकेच्‍या तिजोरीत न भरता परस्‍पर स्‍वत:च्‍या खात्‍यात वळवून लाखोंचा गफला केल्याचा आरोप असलेला मडगाव पालिकेचा कारकून योगेश शेटकर याच्‍याविरोधात पोलिसांनी अखेर गुरुवारी (ता. २५) रोजी रात्री ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली.

योगेशविरोधात मडगाव पालिकेने अफरातफर केल्‍याची तक्रार देऊन एक महिना उलटला तरी पोलिस त्‍याला का अटक करत नाहीत आणि ताे जर सापडत नसेल, तर पोलिस त्‍याच्‍याविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस का जारी करत नाहीत, असे प्रश्‍नार्थक वृत्त ‘गोमन्तक’ने गुरुवारी प्रसिद्ध करून मडगाव पोलिसांच्‍या कार्यक्षमतेवर बोट ठेवले होते. त्‍यानंतर गुरुवारी रात्रीच त्याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नाेटीस जारी करण्‍यात आली.

पालिकेत झालेल्या या घोटाळ्याची ‍मडगावात चर्चा सुरू होती. पोलिस कुणाच्‍या दबावाखाली येऊन मुद्दाम तपासात कुचराई तर करत नाहीत ना, असा प्रश्‍न लाेक करू लागले होते. मुख्‍यमंत्री आणि मुख्‍य सचिव यांच्‍याकडे तक्रार करणारे शॅडो कौन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनीही तपासावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

दोनवेळा नोटीस जारी

याप्रकरणी मडगाव पाेलिसांशी संपर्क साधला असता, योगेशला अटक करण्‍यासाठी कित्‍येकदा पोलिस त्‍याच्‍या घरी गेले. मात्र तो सापडला नाही. बुधवारीही पाेलिस त्‍याला पकडण्‍यासाठी घरी गेले होते. मात्र, तो हाती लागला नाही. फौजदारी आचारसंहिता कलम ४१ नुसार त्‍याला चौकशीसाठी मडगाव पोलिस स्‍थानकात हजर राहावे, अशी दोनवेळा नोटीस जारी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याेगेश पालिकेतूनही गायब :

योगेश शेटकर याला पालिकेने निलंबित केले असले तरी त्‍याला पालिकेत हजर राहण्‍याचा आदेश दिला आहे. असे असले तरी गेला महिनाभर ‍ तो फिरकलेला नाही. रजा मिळावी, यासाठी त्‍याने अर्ज दिला हाेता.

मात्र, हा अर्ज फेटाळल्याची माहिती पालिकेकडून मिळाली आहे. रजा मंजूर झाली नसतानाही शेटकर गैरहजर कसा आणि पालिकेने अद्याप कारवाई का केली नाही, असा सवाल सध्‍या मडगाववासी करू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT