Mapusa : उपोषणास बसलेले विश्वेश प्रभू यांना पाठिंबा देण्यासाठी वास्को ते पणजी अशी पदयात्रा केलेले शंकर पोळजी या आंदोलनासंदर्भात माहिती देताना. Dainik Gomantak
गोवा

...अखेर 'भूमिपुत्र' विधेयकाविरोधातील उपोषण मागे

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे विश्वेश प्रभू यांचा निर्णय

दैनिक गोमन्तक

Mapusa: सत्तरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता विश्वेश प्रभू यांनी भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकाच्या विरोधात केलेले उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे सातव्या दिवशी (मंगळवारी) मागे घेतले आहे.

विश्वेश प्रभू ह्याच्या नेतृत्वाखाली विशेषत: सत्तरी, बार्देश, तिसवाडी तालुका व गोव्यातील अन्य काही भागांत बैठका घेऊन त्या विधेयकाच्या विरोधात जनजागृती करण्यात आली होती. लोकांच्या जोरदार विरोधामुळे सरकार विधेयकावर माघारी आले होते तरी सरकारची ठोस भूमिका अधिकृतरीत्या जाहरी होत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या आंदोलनाचे प्रमुख विश्वेश प्रभू यांनी सरकार जोपर्यंत या विधानसभा अधिवेशनात स्पष्ट भूमिका जाहीर करीत नाही तोपर्यंत उपोषणास बसणार असे जाहीर करून आझाद मैदान येथे उपोषणास बसले होते.

प्रभू केलेल्या मागणीनुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत विधेयक मागे घेत असून राज्यपालदरबारी विधेयक पाठवण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. त्या आश्वासनानंतर विश्वेश प्रभू यांनी उपोषण मागे घेतले.

शंकर पोळजी यांची पदयात्रा…

विश्वेश प्रभू ह्याच्या समर्थनार्थ सातव्या दिवशी वास्कोतील युवक शंकर पोलजी हे वास्को ते पणजी येथील आझाद मैदानापर्यंत पदयात्रा करत आले होते.

आंदोलनात अनेकांचे योगदान!

अ‍ॅड. क्लॉड आल्वारीस, शंकर पोळजी, सुदेश तिवरेकर, श्रीधर नाईक, आगुस्तिन डिकॉस्ता, झरिना, जिना परेरा, रामा काणकोणकर, जवाहरलाल शेट्ये, अ‍ॅड. अनिरुद्ध बोरकर, अ‍ॅड. सुरेश पालकर, अ‍ॅड. हृदयनाथ शिरोडकर, भारत बागकर, केनेडी आफोंन्सो, महेश म्हांबरे, रमेश गावस, शैलेंद्र वेलिंगकर, सलमान खान, किशोर राव, प्रजल साखरदांडे, गणपत झर्मेकर, सचिन मयेकर, अ‍ॅड. अमर नाईक, ऐश्वर्या साळगावकर, गाब्रियल डिकॉस्टा, आर्थर डिसिल्वा, मारियानो फेर्रांव, सबिता मास्कारेन्हास, विशांत कासार, फ्रन्की मोंतेरे, समीर वळवईकर, अविनाश जाधव व इतर भूमिपुत्रांनी या आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT