Fine for Filming in Goa Dainik Gomantak
गोवा

Fine for Filming: गोव्यात हेरिटेज साईटवर परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास भरावा लागेल 'इतका' दंड...

जर गोवा सरकारच्या परवानगीशिवाय तुम्ही जर चित्रीकरण करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Kavya Powar

Fine for Filming in Goa

गोव्यात मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण नेहमीच गोव्यात होत असते. मात्र जर गोवा सरकारच्या परवानगीशिवाय तुम्ही जर चित्रीकरण करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. सरकारच्या परवानगीशिवाय गोव्यातील कोणत्याही राज्य-संरक्षित स्मारक किंवा हेरिटेज साईटवर चित्रीकरण केल्यास 50,000 रुपये दंड भरावा लागेल.

आवश्यक परवानग्या न घेता आणि शुल्क न भरता राज्य सरकारच्या मालकीच्या कोणत्याही संरक्षित स्मारकावर किंवा जागेवर चित्रपट करणाऱ्यांना गोवा सरकारने 50,000 रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच इतर संरक्षित स्मारकांवर चित्रीकरण केल्यास 20,000 रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

8 फेब्रुवारी रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, पुरातत्व विभागाने गोवा प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम 1980 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला. सरकारने सुधारित मसुदा नियमांवर 30 च्या आत विचार करण्यासाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

सदर मसुदा अधिसूचनेनुसार, दिलेल्या कोणत्याही परवानगीचे किंवा परवान्याचे उल्लंघन करून कोणत्याही संरक्षित स्मारकाची कॉपी किंवा चित्रित केल्यास दंड भरावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT