Film City to be set up in Goa Dainik Gomantak
गोवा

Film City to be set up in Goa: गोव्यात उभारणार फिल्मसिटी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीसारखेच असेल परंतु ती आकाराने लहान असेल - मुख्यमंत्री

Pramod Yadav

Film City to be set up in Goa: हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीसारखी फिल्मसिटी गोव्यात स्थापन करणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोव्यात फिल्मसिटी स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे.

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीसारखेच असेल परंतु ती आकाराने लहान असेल. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्याच साखळी मतदारसंघात दिली.

शासनाच्या वतीने आयोजित 5 दिवसीय फिल्म मेकिंग कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी सावंत यांनी राज्यात फिल्मसिटी स्थानपनेचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच, दक्षिण गोव्यातील मडगाव येथे बालचित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मडगावात बालचित्रपट महोत्सव आयोजित केला जाईल. असे सावंत यांनी सांगितले.

युपीतही योगींचा फिल्मसिटीसाठी प्रयत्न

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील त्यांच्या राज्यात फिल्मसिटी उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी योगींनी बॉलिवूड दिग्गज कलाकारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यासोबत बैठक घेतली होती. राज्यात फिल्मसिटी उभारण्यासाठी योगींचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आता गोव्यात देखील फिल्मसिटी उभारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सावंत म्हणाले आहेत. यामुळे राज्यातील पर्यटनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे शिवाय येथील निसर्गरम्य परिसर चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! मूर्ती स्थापनेचे नियम आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT