Dainik Gomantak फोंडा (Ponda) नगरपालिका
गोवा

फोंडा नगराध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम गोपिनाथ कोलवेकर यांच्याविरुद्ध अविश्‍वास दाखल ठराव दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: फोंडा (Ponda) पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम गोपिनाथ कोलवेकर यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव (Filed a no-confidence motion) दाखल करण्यात आला आहे. अविश्‍वास ठराव दाखलेल्या निवेदनावर 7 नगरसेवकांच्या सह्या आहेत. या घडामोडीमुळे फोंड्यातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. या ठरावावर विश्‍वनाथ दळवी (प्रभाग 7), विरेंद्र ढवळीकर (प्रभाग2), वंश सरकार (प्रभाग 3), अर्चना डांगी (प्रभाग 1), अरविंद नाईक (प्रभाग 14), विलियम आगियार (प्रभाग 6) व फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक (प्रभाग 11) यांचा समावेश आहे.

फोंडा पालिकेतील 15 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवकांनी हा अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. हा ठराव संमत होण्यासाठी किमान 8 नगरसेवकांची आवश्‍यकता आहे. नगराध्यक्षाविरुद्ध हा अविश्‍वास ठराव दाखल झाला असल्याने एका नगरसेवक हाती लागण्यासाठी मोठी उलाढाली होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षाविरुद्धच्या ठरावावर मतदान झाल्यास सध्याच्या स्थितीवरून 7 - 7 असा बलाबल दिसते. त्यामुळे फोंडा पालिकेत ही उलथापालथ होणार की या ठराव बारगळणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT