The fight continues until the Old Goa area is declared a heritage division
The fight continues until the Old Goa area is declared a heritage division 
गोवा

"गोंय आणि गोंयकरांचा’ विजयच"

दैनिक गोमन्तक

मडगाव: जनतेच्या दबावासमोर झुकून गोवा सरकारने जुने गोवे परिसर ग्रेटर पणजी पीडीएत सामील करण्याचा निर्णय सोडून दिल्याने हा एकप्रकारे ‘गोंय आणि गोंयकरांचा’ विजयच असल्याची प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. जुने गोवे परिसर वारसा विभाग म्हणून घोषित होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. 


जुने गोवे परिसर पीडीएच्या कार्यक्षेत्रात आणण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न केला होता. त्यावर सरदेसाई यांनी आवाज उठवून त्याविरुद्ध जनमत तयार केले. जुने गोव्याची जागतिक वारसा स्थळे राखून ठेवण्यासाठी त्यांनी युनेस्को आणि इकोमोस या संघटनांना साकडे घातले होते. तसेच केंद्रीय संस्कृती मंत्र्यांना पत्र लिहून हा परिसर ‘वारसा विभाग’ म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली होती.  


जुने गोवे परिसर पीडीएत सामील करण्याचे निर्णय सोडून देण्याची सरकारची कृती  हा संपूर्ण गोवेकरांचा विजय अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली. पण केवळ या यशावर समाधान मानून चालणार नाही. हे सरकार अवसानघातकी असून ते जुने गोवे परिसर कधीही बिल्डर लॉबीपुढे गहाण ठेवू शकतात त्यामुळे जोपर्यंत हा परिसर वारसा विभाग म्हणून जाहीर होत नाही तोपर्यंत हा दबाव चालूच राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ही मागणी लावून धरण्यासाठी आपला पक्ष एक दबाव गट तयार करणार असून त्यात पुरातत्व शास्त्रज्ज्ञ, स्थापत्यकला तज्ञ, अभियंते, नागरनियोजक अशांना सामावून घेण्यात येणार आहे. या गटाच्या निमंत्रक म्हणून गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्ष डॉ. रेणुका दा सिल्वा या असतील. गोव्यातील तज्ज्ञांनी आपल्या सूचना या गटाला कराव्यात असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT