Minister Purushottam Rupala Dainik Gomantak
गोवा

Sagar Parikrama: सागर परिक्रमेचा पाचवा टप्पा आजपासून; केंद्रीय मंत्र्यांची असणार उपस्थिती

रायगड ते काणकोण १९ मे पर्यंत चालणार अभियान

दैनिक गोमन्तक

Sagar Parikrama: केंद्रीय मत्स्यव्यवसाय , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने रायगड ( महाराष्ट्र) ते काणकोण पर्यंत चालणाऱ्या सागर परिक्रमेचा पाचवा टप्पा आजपासून सुरू होत असून तो १९ मे पर्यंत चालणार आहे.

रायगड ते काणकोण या पट्ट्यातील मच्छिमार आणि इतर मत्स्य व्यावसायिक तसंच संबंधितांच्या समस्या जाणून घेणे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा  आणि किसान क्रेडिट कार्ड यासारख्या विविध मत्स्यपालन योजना आणि उपक्रमांचा लाभ मिळवून देऊन त्यांची उन्नती साधणे, हे या परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचे उद्दिष्ट आहे.  

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह विविध मान्यवर,  तसेच विविध सरकारी संस्था, संघटना आणि आस्थापनांचे अधिकारी, परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात सहभागी होणार आहेत.

ही सागर परिक्रमा म्हणजे, भारतीय स्वातंत्र्याला  ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’मागील भावनेचे स्मरण करत, आपले स्वातंत्र्यसैनिक, खलाशी आणि मच्छीमारांचा सन्मान करणारी, तसेच मच्छीमार,  मत्स्य उत्पादक शेतकरी, मत्स्य व्यावसायिक आणि इतर संबंधितांबद्दल दर्शवल्या जाणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे. गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १९ ठिकाणे समाविष्ट करून चार टप्पे यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या अभूतपूर्व उपक्रमाला सर्व लाभार्थींकडून उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळत आहे.

वास्को,मुरगाव, काणकोणचा समावेश

परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात, महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे,  तर गोवा राज्यामधील वास्को, मुरगाव आणि काणकोण अशा एकूण सहा स्थानांचा समावेश असेल.

७२० किमी अंतरांचा समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रात, सागरी मत्स्यपालनाची प्रचंड क्षमता असून, देशाच्या एकूण मत्स्योत्पादनात, महाराष्ट्र  ८२  टक्के योगदान देतो. १०४ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या गोवा राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ९० टक्क्यांहून जास्त लोकांचा मासे हा मुख्य आहार आहे. त्यामुळे मासे गोव्यातील लोकजीवन आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT