Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa: सत्तारी- म्हादई वन्यजीव अभयारण्यात डोंगर माथ्यावर भीषण आग

ही आग विझवण्यासाठी स्थानिक आटोकाट प्रयत्न करीत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात दररोज आगी लागण्याच्या घटना वाढत असून लाखोंची नुकसानी होत असल्याचे समोर येत आहे. आंबा-काजू बागा, बागायती, तसेच माळरान या ठिकाणी आगी लागण्याचे प्रमाण जास्त असून वाऱ्यामुळे अशा ठिकाणच्या आगी वेगाने पसरत जात असल्याचेही पाहायला मिळतेय. अशीच एक घटना सत्तरे-सत्तारी येथील म्हादई वन्यजीव अभयारण्यात घडल्याचे प्राथमिक वृत्त हाती येतेय.

सत्तरे-सत्तारी येथील म्हादेई वन्यजीव अभयारण्यात डोंगराच्या माथ्यावर भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी स्थानिक आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या अभयारण्याशेजारी काजू बागांना असल्याने या आगीमुळे काजू बागायतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच स्थानिक हि आग थांबवण्यासाठी धडपडत असल्याची माहिती समोर येतेय.

हि आग नेमकी कशी लागली? या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली आहे का? या बाबत अद्याप तरी सविस्तर माहिती मिळू शकली नाहीय. मात्र गोव्यात सध्या लागणाऱ्या या आगींमुळे जनतेतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT