Fire Brigade Dainik Gomantak
गोवा

कळंगुट येथील चार दुकानात भीषण आग

वेर्णा येथे काही दिवसांपूर्वी आग लागली होती. सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे इंडियन ऑइल अदानी गॅस पाईपलाईनने पेट घेतला.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: येथील हॉटेल कळंगुट टॉवर जवळील दुकानांमध्ये आज (मंगळवार) सकाळी भीषण आग लागली. यामध्ये चार दुकाने आगीत खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीचे मुख्य कारण अद्याप समजलेले नाही. अग्निशमन दल (Fire brigade) घटनास्थळी पोहचले आहे. आग विजवण्याचे काम सुरू आहे. (Goa Latest News)

दरम्यान, वेर्णा येथे काही दिवसांपूर्वी आग लागली होती. सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे इंडियन ऑइल अदानी गॅस पाईपलाईनने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना 30 जानेवारीला दुपारी 12 च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी वेर्णा येथे राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) वेर्णा ते दाबोळी मार्गावर एका ठिकाणी सुक्या गवताला आग लागली होती. दुपारची वेळ असल्याने आगीने अधिकच पेट घेतला. दरम्यान याविषयी वेर्णा अग्निशमन दलाला माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान बंबसहित घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली.

नववर्षाच्या पहाटे कळंगुटमध्ये दुकानांना आग (Fire) लागण्याची घटना घडली. यामध्ये कपड्यांची चौदा दुकाने जाळून खाक झाली होती. या आगीत अंदाजे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT