goa burglaries festive season crime news Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

goa burglaries festive season crime news: सणासुदीच्या काळात राज्यात घरफोड्या आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

तोरसे: सणासुदीच्या काळात राज्यात घरफोड्या आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. तोरसे आणि दवर्ली येथे घरफोड्यांच्या घटना घडल्या असून, मडगावातील एका नागरिकाला सायबर भामट्यांनी ४.२० लाख रुपयांना गंडा घातला. दुसरीकडे, बँक ऑफ बडोदाची तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कुटुंब नाटकाला गेले, अन चोरट्यांनी साधला डाव!

फकीरपाटो-तोरसे येथील रमेश बाबल मावळणकर यांचे कुटुंब शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नाटक पाहण्यासाठी घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. नाटक संपल्यानंतर कुटुंबीय घरी परतले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी कपाटाच्या चाव्या शोधून कपाटातील सोन्याची कर्णफुले आणि रोख रक्कम चोरली. मात्र, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर वस्तूंना हात लावला नसल्याचे मावळणकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पेडणे पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

बँकेला ७५ लाखांना फसवणाऱ्या तिघांविरोधात गुन्‍हा

मडगावातील बँक बडोदाची फसवणूक करून ७५ लाखांचे कर्ज उकळल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. युवराज नाईक, उदय नाईक व उर्वशी नाईक अशी संशयितांची नावे असून, भारतीय दंड संहितेच्या ४०३, ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४२२ सह ३४ अन्वये कलमांखाली त्‍यांच्‍याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, बँक ऑफ बडोदा, गांधी मार्केट शाखा, मडगावचे रितेश वर्मा हे तक्रारदार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०२३ या कालावधीत गांधी मार्केट मडगाव येथील पूर्वीच्या विजया बँकेत जी नंतर बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली तेथे हा गैरप्रकार झाला होता. युवराज नाईक याने बँकेकडून ७५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्याने नुवे येथील एक भूखंड हमी म्हणून दाखवली होती. हा भूखंड उदय नाईक आणि उर्वशी नाईक यांच्या नावावर असल्याचे व ते त्याचे कायदेशीर मालक असल्याचे भासवून बँकेची दिशाभूल करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मडगावातील एकाला ‘सायबर’ गंडा

मडगावमधील (Margao) एका व्यक्तीला सायबर भामट्यांनी बँक ऑफ इंडियाचा दाखला देत, पेन्शनसंदर्भातील मेसेज पाठवला. संबंधित व्‍यक्तीने मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्‍याच्‍या बँक खात्‍यातून सुमारे ४.२० लाख रुपयांची रक्कम गायब झाली, असे त्‍याने पोलिसांना दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.

दवर्लीत सुमारे ४.५६ लाखांची चोरी

गेल्‍या शुक्रवारी दवर्ली येथील ॲनसी ए यांच्‍या घराचा मुख्‍य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट फोडले व सोन्याचे दागिने, चांदीची बिस्किटे व नाणी असा एकूण सुमारे ४.५६ लाखांचा ऐवज लंपास केल्‍याची तक्रारी ॲनसी ए यांनी मायणा–कुडतरी पोलिस स्‍थानकात दाखल केली. त्‍यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक आशुतोष नाईक पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT