Ferryboat Employee Arrest Dainik Gomantak
गोवा

Sexual Abuse: मोबाईल नंबरसाठी अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फेरीबोट कर्मचाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Ferryboat Employee Arrest: फेरीबोट कर्मचाऱ्याला 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक

Akshata Chhatre

जुने गोवे: महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचारांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ओल्ड गोवा पोलिसांनी शनिवारी (दि. 9 नोव्हेंबर) रोजी एका फेरीबोट कर्मचाऱ्याला 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिच्यावर मोबाईल नंबर देण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी अटक केली आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुदेश नावाचा एका फेरीबोट कर्मचारी पीडितेचा पाठलाग करत होता आणि तिला मोबाईल नंबर देण्याची जबरदस्ती करत होता.

पीडिता फेरीबोटीने जात असताना त्याने मुलीचा हात पकडला, तसेच तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. गवंडाळी फेरीमधून पीडिता परत येत असताना सुदेशने पुन्हा तिचा पाठलाग करत तिच्यावर मोबाईल नंबर देण्यासाठी जबरदस्ती केली.

गोवा पोलिसांकडून यापूर्वी देखील बिहारमधील 29 वर्षीय बांधकाम कामगाराला चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली होती.

ही मुलगी युरोपमधील असून 2016 पासून तिच्या कुटुंबाचे भारतात वास्तव्यासाठी आले होते. या घटनेनंतर संशयित आरोपीच्या नावे POCSO आणि गोव्यातील कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT