Vasco Gas Leakage Dainik Gomantak
गोवा

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Vasco Gas Leakage: कामानिमित्त गोव्यात आलेले सर्व तरुणांनी फकीर गल्ली परिसरात दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या.

Pramod Yadav

Vasco Gas Leakage

घरगुती सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे रविवारी पहाटे मांगोर हिल, वास्को येथे झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर तिघेजण अत्यवस्थ असून त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल बिंद, (वय 19 वर्षे), अमन यादव (वय 22 वर्षे), धरमवीर बिंद (वय 21 वर्षे) आणि संजय बिंद (वय 21 वर्षे) हे सर्व उत्तर प्रदेश येथील रहिवासी रझाई केवट यांच्या मालकीच्या मांगोर हिल येथील भाड्याच्या खोलीत राहात होते.

कामानिमित्त गोव्यात आलेले सर्व तरुणांनी फकीर गल्ली परिसरात दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. सकाळी त्यांना त्यांच्या शेजारी दुसऱ्या खोलीत राहात असलेल्या त्यांच्या मित्रांनी उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी एकाची प्रकृती चिंताजनक

चौघेजण शनिवारी रात्री या खोलीत झोपले. मात्र, रात्री अचानक त्यांच्या घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती झाली आणि चौघेही बेशुद्ध पडले.

पोलिसांनी ज्यावेळी खोलीत प्रवेश केला, त्यावेळी चौघेही अत्यवस्थ अवस्थेत पडलेले आढळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एकाच्या तोंडातून रक्त येत असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अन्य दोघांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT