Fishing Dainik Gomantak
गोवा

Fishing: गोव्यात आता फिशिंग रॉडने मासेमारी करणाऱ्यांना भरावे लागणार शुल्क

नद्यांमध्ये मासेमारी करणाऱ्यांना हे शुल्क लागू होणार नाही, असे मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

Goa Fishing: खोल समुद्रात फिशिंग रॉड घेऊन मासेमारी करणाऱ्यांना आता शुल्क द्यावे लागणार आहे. कारण 300 प्रकारचे मासे पकडण्याचे हुक वापरतात. परिणामी ही मंडळी मोठे मासे पकडतात. त्यामुळे हे शुल्क आकारले जाईल.

परंतु नद्यांमध्ये मासेमारी करणाऱ्यांना हे शुल्क लागू होणार नाही, असे मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

काही व्यक्ती फिशिंग रॉडचा वापर करून मोठे मासे पकडतात. इतर राज्यांतील व्यक्ती येऊन मोठ्या संख्येत हा प्रकार करत असल्याची माहिती मच्छीमार खात्याला मिळाली आहे. ट्रालर्सदेखील हेच काम करत असल्याने त्यांच्याकडून शुल्क आकारले जात आहे.

त्यासाठी शुल्क लागू केले आहे. मात्र, काही जणांचा नद्यांमध्येदेखील शुल्क आकारले जाईल, असा गैरसमज झाला आहे. पण तसे काही होणार नाही, असे हळर्णकर यांनी सांगितले.

‘लम्पी’मुळे सावध भूमिका

लम्पी व्हायरस गुरांच्या दुधातून माणसामध्ये येऊ शकतो, त्यामुळे सध्या शेजारच्या राज्यातून गुरे आणण्यासंदर्भात सावधगिरीची भूमिका घेतली आहे. परंतु राज्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

यासाठी कामधेनू योजनेतदेखील आवश्‍यक बदल केले आहेत, असे पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

Goa Crime: म्हापशात पोलिसांची मोठी कारवाई;2 किलो गांजा जप्त, झारखंडच्या 22 वर्षीय युवकाला अटक

Porvorim Elevated Road: 600 कोटींचा पर्वरी उन्नत मार्ग, तरीही वाहतूक कोंडी कायम! अपघातानंतर निर्बंधांचा भडिमार; 'सदोष नियोजनाची जबाबदारी कोणाची?'

SCROLL FOR NEXT