FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid Margao: ‘एफडीए’ची मडगावात छापेमारी; दोन कारमधून 500 किलो मावा जप्त

500 kg Mawa Seized Goa: एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या टीमने मडगावात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन दोन कारमधून तब्बल 1.89 लाखांचा मावा जप्त केला.

Manish Jadhav

FDA Seizes 500 Kg of Mawa Worth ₹1.89 Lakh in Margao Raids

मडगाव: राज्यात गेल्या काही दिवसांत एफडीएच्या कारवाया वाढल्या आहेत. एफडीएचे अधिकारी सातत्याने छापेमारी करुन भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करत आहेत. यातच आता, एफडीए अधिकाऱ्यांच्या टीमने मडगावात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन दोन कारमधून तब्बल 1.89 लाखांचा मावा जप्त केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आज (7 एप्रिल) मडगावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन तब्बल 500 किलो मावा जप्त केला. दोन कारमधून (Car) हा मावा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या माव्याची बाजारभावानुसार किंमत 1.89 लाख आहे. रिचर्ड नोरोन्हा आणि संजोत कुडाळकर यांच्या टीमने ही कारवाई केली.

फास्ट फूड दुकानांवर कारवाई

तीन दिवसांपूर्वी, म्हापसा (Mapusa) येथील जुने मार्केट (अलंकार थिएटर) परिसरातील फास्ट फूड दुकानांवर एफडीएने छापेमारी करुन मोठी कारवाई केली होती. अस्वच्छ जागेतील काही फास्ट फूड बंद करुन शिजलेल्या वस्तू यावेळी जप्त करण्यात आल्या होत्या. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक ही कारवाई करत येथील फास्ट फूड स्टॉल्सची तपासणी केली होती. येथील जवळपास 70 टक्के फास्ट फूड आणि हॉटेल रेस्टॉरंट दुकाने अस्वच्छतेमुळे बंद करण्यात आली होती. यापूर्वी देखील येथील दुकाने बंद करण्यात आली होती. अन्न आणि औषधे प्रशासनाने छापा टाकून रेस्टॉरंट आणि फास्ट फूड मिळून एकूण 10 आस्थापने बंद केली. ही आस्थापने अस्वच्छ तसेच असुरक्षित असे खाद्यपदार्थ बनवत होती, असे अधिकाऱ्यांना पाहणीवेळी आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT