food department raid Goa Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: "सकारात्मक बदल!" पेडण्यात FDA ची विशेष मोहीम, 19 हॉटेल्सची तपासणी; 4 तात्काळ बंद

FDA action Pernem: गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक रिचर्ड नोरोन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली

Akshata Chhatre

पेडणे: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई केली जात आहे. बुधवार (दि.१०) रोजी आश्वे आणि मोरजी येथे रात्री उशिरा काही अन्न विकणाऱ्या दुकानांवर अचानक धाड टाकत पाहणी करण्यात आली. गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक रिचर्ड नोरोन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आश्वे आणि मोरजी परिसरात विशेष मोहीम राबवून एकूण १९ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या चार आस्थापनांना तात्काळ कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत आणि आस्थापनांना योग्य स्वच्छता राखण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

रिचर्ड नोरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा अन्न आणि औषध विभागाच्या अधिकारी योगिता शिरसाट यांच्या गटासह पेडणे तालुक्यातील काही खाद्य पदार्थांच्या आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी धडक पथकाकडून एकूण १९ आस्थापनांची चौकशी करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईच्या तुलनेत यावेळी अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. पेडणे तालुक्यात अनेक स्थानिकांकडून देखील खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालवला जातो मात्र मागच्या वेळेपेक्षा यावेळी स्वयंपाकघरं बऱ्यापैकी स्वच्छ आणि नीटनेटकी असल्याचं त्यांनी सांगितलं.

काही मोजक्या आस्थापनांमध्ये अजूनही स्वयंपाकघराची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. या धडक कारवाईत केवळ चार आस्थापनांना स्वयंपाकघर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत आणि इतरांनी उत्तम कामगिरी करून दाखवल्याचं सांगत रिचर्ड नोरोन्हा यांनी पेडण्यात स्थिती सकारात्मक असल्याची माहिती दिली.

कुठेतरी फारशा तुटलेल्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न कायम आहे, परिणामी या आस्थापनांच्या मालकांना १ ते ४ हॉटेल किंवा दुकान बंद ठेऊन स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आलेत. रिचर्ड नोरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार या धडक कारवाईत एका मोठा हॉटेलचा देखील समावेश होता ज्यात कुजलेल्या अन्न-पदार्थांचा वापर आढळून आलाय आणि या हॉटेलचा पुढील तपास नक्कीच केला जाईल असं रिचर्ड नोरोन्हा म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT