Mapusa hotel sealed Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: उत्तर गोव्यात FDA ची धडक कारवाई!! 24 आंब्यांच्या नमुन्यांची तपासणी; अस्वच्छतेमुळे 'म्हापशातील प्रसिद्ध हॉटेल' सील

Goa Food Safety Raid: तपासात एकूण २४ आंब्याचे आणि ४ इतर फळांचे नमुने घेण्यात आले, म्हापसा बाजारातील दुकानांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याने दुकानांचा साठा तातडीने जप्त करण्यात आला

Akshata Chhatre

पणजी: उत्तर गोव्यातील आंब्याच्या घाऊक विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई करत तपास मोहीम राबवली. या तपासात एकूण २४ आंब्याचे आणि ४ इतर फळांचे नमुने घेण्यात आले असून, म्हापसा बाजारातील दोन दुकानांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याने त्या दोन्ही दुकानांचा साठा तातडीने जप्त करण्यात आला आहे.

एफडीएच्या या पथकात उत्तर गोवा विभागाचे नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, लेनिन डीसा, अमित मांद्रेकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी सफिया खान यांचा समावेश होता. ही कारवाई एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पारपडली.

शिवोली येथील ७ स्थानिक आंबा विक्री केंद्रे आणि म्हापसा सबयार्डमधील ८ परराज्यातून आंबा आणणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.

यावेळी सुमारे १८० कॅरेट्‌स आंबे आणि ४५० किलो केळी यांचा साठा तपासण्यात आला. म्हापसा यार्डमधील दोन दुकानांत आढळलेल्या संशयास्पद पदार्थांमुळे संबंधित साठा जप्त करण्यात आला असून, नमुने रासायनिक अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

म्हापसा शहरातील प्रसिद्ध 'वाळके हॉटेल' सील

अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई आणखी तीव्र करत आता म्हापसा शहरातील प्रसिद्ध 'वाळके हॉटेल' सील केले आहे. हॉटेलच्या परिसरात अस्वच्छताआढळली असून अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या या तत्पर आणि कठोर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. असुरक्षित अन्न पद्धतींच्या नियमांबद्दल अन्न व औषध प्रशासन अगदी काटेकोर असल्याचं या धडक कारवाईतून आढळून आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT