FDA Raid Dainik Gomantak
गोवा

Panaji Bus Stop: उंदरांचा उपद्रव, स्वच्छतेच्या तीनतेरा; पणजी बसस्थानक परिसरातील अन्न व्यवसायिकांना FDA चा दणका, स्टॉल बंद करण्याचे आदेश

FDA Raid In Panjim: पणजीतील केटीसी बसस्थानक व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धडक तपासणी मोहीम राबवली.

Sameer Amunekar

पणजी: पणजीतील केटीसी बसस्थानक व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)च्या अधिकाऱ्यांनी अचानक धडक तपासणी मोहीम राबवली.

यामध्ये एकूण २६ अन्न व्यवसायस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ व्यवसायांना गंभीर अस्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली केल्यामुळे तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आल्याची माहिती ‘एफडीए’ संचालक श्वेता देसाई यांनी दिली.

देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने या परिसरात उंदीर वावरत असल्याची तक्रार केली होती. त्याअनुषंगाने ही मोहीम पूर्वी झालेल्या तपासणीच्या आधारे राबवण्यात आली होती. काही विक्रेत्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत सकारात्मक सुधारणा केल्याचे निरीक्षणात आले असले तरी अनेक ठिकाणी अद्यापही गंभीर त्रुटी दिसून आल्या.

विशेषतः आरटीओच्या अंतर्गत आंतरराज्य बसस्थानक परिसरात काम करणाऱ्या स्ट्रीट फूड विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. परिसरात उंदरांचा उपद्रव असल्याने त्या विक्रेत्यांना तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे व परिसर स्वच्छ करून सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.

एफडीएचे उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. त्यांच्यासमवेत श्रद्धा खुटकर, अंकिता, प्रीतम परब, सफिया खान, लेनिन डिसा आणि अमित मांद्रेकर या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

ही संपूर्ण कारवाई ‘एफडीए’च्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ‘एफडीए’ने पुढील आठवड्यात पुन्हा एकदा पुनर्तपासणी मोहीम राबवण्याचा निर्धार केला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विक्रेत्यांना सुधारणा सूचना

अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत ३ विक्रेत्यांवर प्रत्येकी १०,००० रुपये, तसेच २ विक्रेत्यांवर अनुक्रमे ५,००० आणि २,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याचप्रमाणे केटीसी बसस्थानकात स्वच्छता नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या आणखी ४ स्टॉलधारकांना प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ (एफएसएसए)च्या कलम ३२ अंतर्गत काही विक्रेत्यांना सुधारणा सूचना देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT