FDA raid baga goa Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: कळंगुट-बागा येथे 'सर्जिकल स्ट्राईक! निकृष्ट काजू विकणाऱ्यांवर चाप; एका रात्रीत 8 दुकाने, 3 रेस्टॉरंट बंद

FDA raid Calangute Baga: अन्न व औषध प्रशासन विभागाने कळंगुट आणि बागा येथे अचानक रात्री उशिरा केलेल्या तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे

Akshata Chhatre

कळंगुट: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कळंगुट आणि बागा येथे अचानक रात्री उशिरा केलेल्या तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे काजू विकणाऱ्या ८ दुकानांवर कारवाई करून ती बंद करण्यात आलीयेत . याशिवाय, बागा जंक्शन येथील ३ मुघलाई रेस्टॉरंटही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंद करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान, एफडीएच्या पथकाने कळंगुट आणि बागा येथील एकूण १९ दुकानांची तपासणी केली. यात कळंगुटमधील १ आणि बागा येथील ७ दुकाने निकृष्ट दर्जाचे काजू विकताना आढळल्याने ती तातडीने बंद करण्यात आली.

निकृष्ट दर्जाचे काजू विकणाऱ्या विक्रेत्यांवर प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर गैर-ब्रँडेड काजू विकणाऱ्यांवर प्रत्येकी २०,००० रुपयांचा दंड लावण्यात आला. या निकृष्ट साठ्याचा स्रोत शोधण्यासाठी पुढील तपासही सुरू करण्यात आला आहे. याच मोहिमेत बागा जंक्शनवरील तीन मुघलाई रेस्टॉरंट्सही विविध नियमांचे उल्लंघन करताना आढळली. त्यामुळे ती बंद करून त्यांच्यावर प्रत्येकी २०,००० रुपयांचा दंड लावण्यात आला.

एफडीए संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा विभागाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी ही कारवाई केली. या पथकात वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, डार्लान दिउकर, प्रितम परब, सुजाता शेटगावकर यांच्यासह अर्जुन नाईक, संदीप शेळके आणि प्रदीप परसेकर यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT