FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: पिळर्ण, पर्रा येथे एफडीएचा छापा; दोन मटण शॉप, IDC येथील कँटीन सील, काजू युनिटवरही कारवाई

Goa FDA Raid: कँटीनमध्ये स्वच्छता नसल्याचे आढळून आल्याने एफडीएच्या वतीने कारवाई करत कँटीनला टाळे ठोकण्यात आले.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरुच आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मिळणारे स्टोर, हॉटेल, दुकाने यावर एफडीएकडून सक्त कारवाई केली जात आहे. गुरुवारी एफडीच्या वतीने पिळर्ण आणि पर्रा येथे कारवाई करत कँटीन आणि मटण शॉपवर कारवाई करु बंद करण्यात आली.

पिळर्ण IDC येथील कँटीन बंद

पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीत सुरु असलेल्या कँटीनला एफडीएच्या वतीने टाळे ठोकण्यात आले. या कँटीनमध्ये अतिशय निकृष्ट पद्धतीने खाद्यपदार्थ तयार केले जात होते. कँटीनमध्ये स्वच्छता नसल्याचे आढळून आल्याने एफडीएच्या वतीने कारवाई करत कँटीनला टाळे ठोकण्यात आले.

पर्रा येथे दोन मटण शॉपला टाळे

पर्रा येथील दोन मटण शॉपला एफडीएकडून टाळे ठोकण्यात आले. याठिकाणी वैध परवाना न घेत मटणासाठी प्राण्यांची कत्तल सुरु होती. तसेच, आवश्यक स्वच्छतेची काळजी घेतली जात नव्हती. यावरुन एफडीएने शॉपला टाळे ठोकले.

काजू प्रक्रिया युनिट

या काजू उत्पादन केंद्रात कालबाह्य कच्चा माल वापरून उत्पादन चालू असल्याचे आढळून आले. मसाले, स्क्वॅश, फ्लेवर्स, सीझनिंग्स आणि रेडी-टू-ड्रिंक मिश्रण अशा सुमारे ₹4 लाख किमतीच्या वस्तू स्थानिक पंचायतीच्या मदतीने घटनास्थळी नष्ट करण्यात आल्या. संबंधित व्यवसायिकास आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देत सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.

FDA संचालिका श्वेता देसाई यांच्या नेतृत्वाखाली डिझायनेटेड ऑफिसर रिचर्ड नॉरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, लेनिन दे सा आणि डार्लन दिऊकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT