Goa Davorlim FDA Raid Dainik Gomantak
गोवा

Davorlim FDA Raid: 'एफडीए'ची दवर्लीत धडक मोहिम! अस्‍वच्‍छ जागेत साठवलेला ३५ हजारांचा मावा जप्त

Goa FDA Raid News: एफडीएने दवर्ली येथे अन्न व्‍यवसाय चालकांचा परवाना आणि स्‍वच्‍छता विषयक परिस्‍थिती तपासण्‍यासाठी तपासणी मोहीम हाती घेतली. या तपासणीत दवर्ली येथील मिठाई उत्‍पादक मेसर्स मल्‍लेश्‍‍वर फूड प्राेडक्‍ट हे वैध एफएसएसएआय परवान्‍याशिवाय मिठाई तयार करत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एफडीएने बुधवारी दवर्ली येथे अन्न व्‍यवसाय चालकांचा परवाना आणि स्‍वच्‍छता विषयक परिस्‍थिती तपासण्‍यासाठी तपासणी मोहीम हाती घेतली. या तपासणीत दवर्ली येथील मिठाई उत्‍पादक मेसर्स मल्‍लेश्‍‍वर फूड प्राेडक्‍ट हे वैध एफएसएसएआय परवान्‍याशिवाय मिठाई तयार करत होते. शिवाय ती जागा अस्‍वच्‍छ होती. ‘एफबीओ’वर कलम ३१ ची सूचना देण्‍यात आली होती आणि तपासणी अहवालदेखील जारी केला होता.

‘एफबीओ’ला तो वैध ‘एफएसएसएआय’ परवाना मिळेपर्यंत मिठाई तयार करण्‍याचे थांबविण्‍याचे निर्देश दिले आहे. या ठिकाणी सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा १२५ किलो मावा अयोग्‍य स्‍थितीत अस्‍वच्‍छ जागेत साठवून ठेवल्‍याचे आढळून आले.

अयोग्‍यरित्‍या साठवून ठेवलेला हा मावा सार्वजनिक आरोग्‍याच्‍या हितासाठी धाेकादायक असल्‍याने ‘एफबीओ’ने ताे स्‍वेच्‍छेने जप्‍त करून नष्‍ट केला. ही कारवाई ‘एफडीए’च्‍या संचालक श्‍वेता देसाई यांच्‍या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी संज्‍याेत कुडाळकर, वरिष्‍ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, स्‍नेहा नाईक, अभिषेक नाईक आणि गौरेश गावकर, साईनाथ मांद्रेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT