FC Goa
FC Goa  Dainik Gomantak
गोवा

FC गोवाच्या शिबिरात चाहत्यांचा उत्साह

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाच्या मोसमपूर्व सरावातील पहिले सत्र शनिवारी संध्याकाळी साल्वादोर द मुंद पंचायत फुटबॉल मैदानावर झाले, त्यावेळी चाहत्यांच्या उत्साही प्रतिसादाने खेळाडू भारावले.

(FC Goa's camp was held at Salvador do Mundo)

शिबिरात परदेशी खेळाडूंनीही भाग घेतला. एफसी गोवाचा नवोदित संघ सध्या कोलकात्यात ड्युरँड कप स्पर्धेत खेळत आहे. या संघात असलेले चार खेळाडू वगळता प्रमुख संघातील सर्व खेळाडूंनी सराव सुरू केला.

चाहते आशावादी

गतमोसमात एफसी गोवा संघाला आयएसएल फुटबॉल स्पर्धेत निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. अकरा संघांत त्यांना नववा क्रमांक मिळाला. आता २०२२-२३ मोसमासाठी एफसी गोवाचे माजी खेळाडू स्पेनचे पेनया यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ चांगली कामगिरी करण्याबाबत चाहते आशावादी आहेत हे साल्वादोर द मुंद मैदानावरील पाठिराख्यांची उत्स्फूर्त उपस्थिती प्रदर्शित करत होते.

शारीरिक सक्षमतेवर भर

पहिल्या सराव सत्रानंतर प्रशिक्षक पेनया यांनी सांगितले, की ‘‘मोसमपूर्व सरावातील हे सुरवातीचे दिवस आहेत. स्पर्धेसाठी खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे, आम्हाला कशाप्रकारचे फुटबॉल खेळायचे आहे याबाबत खेळाडूंच्या कल्पनांवर काम करून त्यानुसार संघ बांधणी करणे आणि भक्कम गट तयार करणे हेच उद्दिष्ट्य आहे. संघात काही नवे खेळाडू आहेत. त्यांचा जुन्या खेळाडूंशी समन्वय घडवून आणत सर्वांना एकाच मार्गावरून न्यायचे आहे.’’

संपूर्ण मोसमासाठी ऊर्जा

एफसी गोवाच्या चाहत्याबद्दल पेनया म्हणाले, की ‘‘लोक मोठ्या उत्साहाने येतात आणि मैदानावरील सरावाची त्यांना उत्सुकता असते. मोसमपूर्व कालावधीत हे नेहमीच घडते. वचनबद्ध आणि चांगली ऊर्जी असलेले खेळाडू मी पाहत आहे. हेच संपूर्ण मोसमात कायम राखण्याचे आमचे ध्येय आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT