FC Goa Dainik Gomantak
गोवा

RFDL: केरळा ब्लास्टर्सवर निसटता विजय नोंदवत एफसी गोवा अव्वल

ब्रायसन फर्नांडिस याने 48 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवाने आघाडी घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

Reliance Foundation Development League एफसी गोवा संघाने केरळा ब्लास्टर्सवर एका गोलने निसटता विजय नोंदवून रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (आरएफडीएल) फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीतील बंगळूर विभागात अव्वल स्थान मिळविले.

बंगळूर फुटबॉल स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत ब्रायसन फर्नांडिस याने 48 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवाने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली.

गटातील पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीनिदी डेक्कन एफसीवर 3-0 फरकाने मात केली होती. एफसी गोवाचे आता सहा गुण झाले आहेत.

आरएफडीएल स्पर्धेची गोवा विभागीय फेरी आणि आता मुख्य फेरी मिळून एफसी गोवा संघ सलग 12 सामने अपराजित आहे. यामध्ये दहा विजय व दोन बरोबरींचा समावेश आहे. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना दोन मे रोजी लिफ्फा त्रिवेंद्रम संघाविरुद्ध बंगळूर येथे खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT