Fault in E-Challan Devices of Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

वाहतूक उल्लंघन दंडाच्या पैशांत घोटाळा होतोय? ई-चलन मशीन्समध्ये त्रुटी, पोलीस अधीक्षकांनी दिले स्पष्टीकरण

या मशीन्समध्ये काहीतरी बग असल्याचे सांगण्यात येते

Kavya Powar

Fault in E-Challan Devices of Goa Traffic Police

राज्यातील वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी वाहनचालकांना ई-चलन देतात. मात्र मागील 4 वर्षांपासून वाहतूक पोलीस वापरत असलेली ही ई-चलन मशीन्स बनावट असल्याचे आता समोर आले आहे.

माहितीनुसार, या मशीन्समध्ये काहीतरी बग असल्याचे सांगण्यात येते. या मशीनद्वारे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेगवेगळ्या मशीन्सवर लॉगिन करता येते. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा हा पैसे कमावण्याचा नवा फंडा असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी या मशीन्समध्ये काहीतरी अडचण असल्याचे सांगत अधिकाऱ्यांची बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन्समधे बग आहे हे विभागाला कळण्यासाठी तब्बल 4 वर्षे वेळ का लागतो? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले की, वाहनचालकांनी कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांच्याकडून दंड वसूल करणे हे वाहतूक पोलिसांचे कामच आहे.

सध्या जरी एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर लॉगिन करता येण्याचा मुद्दा समोर आला असला तरी त्या दंड मशीन्सवरून जमा होणारे पैसे हे सरकारच्या खात्यातच जमा होत आहेत.

जर हा वाहतूक दंड कोणत्याही वैयक्तिक बँक खात्यात वळवण्यात येत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कौशल यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! 'महादेवी' नांदणी मठात परतणार; मठ, वनतारा, शासन यांची एकत्रित याचिका

Goa Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करणं पडलं महागात, पाजीफोंड येथील 24 वर्षीय युवतीला 3.30 लाखांचा चुना; आरोपी गजाआड

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Assembly Live: "जर सनबर्न झाला नाही तर दुसरा कोणीतरी येईल" पर्यटन मंत्री

Mapusa heavy rain: म्हापशात दाणादाण! मुसळधार पावसानं झोडपलं; 24 तासांत 4 इंच पाऊस, रस्ते पाण्याखाली

SCROLL FOR NEXT