Vijay Sardesai And Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai:...अखेर आमदार सरदेसाईंनी मागितली सभापती तवडकरांची माफी

सभापतींचा अपमान केला नसल्याचे विजय सरदेसाई यांचे स्पष्टीकरण

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी मंगळवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. जोपर्यंत सरदेसाई आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत तोपर्यंत मी विरोधी पक्षाच्या सदस्यांना भेटणार नाही, अशी भूमिका सभापती तवडकर यांनी घेतली होती. दरम्यान, दोन दिवसांच्या कालावधीनंतर आमदार विजय सरदेसाई यांनी तवडकर यांची माफी मागितली आहे.

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. आगामी अधिवेशनात खासगी सदस्य दिनाचा समावेश करावा, अशी मागणी सरदेसाई यांनी सोमवारी सभापतींकडे केली होती. यावेळी पत्रकारांना माहिती देताना सरदेसाई यांनी, सभापती हे मुख्यमंत्र्यांच्या कामगारासारखे वागत आहेत. अशी टीका केली होती.

विजय सरदेसाई यांची माफी

आपण सभापती तवडकरांचा अपमान केलेला नाही. एखादे वक्तव्य वाईट अथवा अपमानास्पद वाटले असल्यास मी माफी मागतो. सभापतींनी विरोधी अमदारांचे हक्क जपून अधिकवेशन वेळ वाढवून लोकांचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी.

दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई आणि इतर विरोधी आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. सभापती तवडकर हे दुटप्पी भुमिका घेत आहेत. सरकारने जरी कामकाजाचे दिवस ठरवले असले तरी सभापती खासगी सदस्यांसाठी दिवस देऊ शकतात. सभापतींना तेवढे अधिकार असतात. सभापतींनी जर अधिवेशनाचा कालावधी 15 दिवसांनी वाढवला तर मी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांची माफी मागतो, असे वक्तव्य सरदेसाईंनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT