Goa ST Reservation
Goa ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation:...तर विधानसभा निवडणुकीत एसटी बांधवांना आरक्षण मिळणे कठीण; विजय सरदेसाई

सुशांत कुंकळयेकर

Goa ST Reservation: गोव्‍यातील एसटी बांधवांना 2024 च्‍या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळेल की नाही यासंदर्भातील सरकारने आपली भूमिका या लाेकसभा निवडणुकीच्‍या पूर्वी स्‍पष्‍ट करावी अशी भूमिका आमदार विजय सरदेसाई यांनी मांडली.

मतदारसंघाची फेररचना केल्‍यावर आरक्षणाचा निर्णय घेणार ही सरकारची भूमिका असेल तर येत्‍या विधानसभा निवडणुकीत गोव्‍यातील एसटी बांधवांना आरक्षण मिळणे कठीण आहे, असे चिंता सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

आज मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन या संघटनेच्‍या शिष्‍टमंडळाने विजय सरदेसाई यांची ‘गोंयकार घर’मध्‍ये भेट घेतली आणि राजकीय आरक्षणाच्‍या प्रित्‍यर्थ 5 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेवर एसटी बांधवातर्फे मोर्चा नेण्‍यात येणार आहे त्‍याला सरदेसाई यांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

ही मागणी धसास लावण्‍यासाठी केंद्र सरकारकडे एक सर्वपक्षीय शिष्‍टमंडळ नेण्‍यात यावे अशीही मागणी यावेळी या शिष्‍टमंडळाने केली. या शिष्‍टमंडळात जोजफ वाझ, रवींद्र वेळीप तसेच अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

गाेव्‍यात आणि केंद्रात दोन्‍हीकडे भाजपचे सरकार आहे त्‍यामुळे केंद्रात सर्वपक्षीय शिष्‍टमंडळ नेण्‍याची गरजच काय असा सवाल करत सरदेसाई म्‍हणाले, तर गाेव्‍यातील भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करायची असेल तर त्‍यांना केंद्र सरकारशी संपर्क साधून ही मागणी मान्‍य करणे सहज शक्‍य आहे.

मात्र या सरकारला तसे करायचे नाही असे वाटते. विधानसभा मतदारसंघ फेररचना हे निमित्त पुढे करुन या सरकारला एसटी बांधवांना मिळणारे राजकीय आरक्षण आणखी लांबवायला पाहिजे. भाजपात जे एसटी आमदार आहेत ते या संदर्भात का आवाज उठवत नाहीत असा सवाल त्‍यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT