Fatorda Dainik Gomantak
गोवा

Fatorda News : सां जुझे दि आरियल येथे भंगार अड्ड्यामुळे त्रास

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda News :

फातोर्डा, सां जुझे दि आरियल येथील आयडीसीमधील भंगार यार्डामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे भंगार अड्डे तातडीने हटविण्यात यावेत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

या भंगार अड्ड्यामुळे येथील परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. येथे कोणतीही स्वच्छता पाळण्यात येत नाही, अशी माहिती स्थानिक रहिवासी फ्रेडी त्रावासो यांनी दिली.

त्रावासो यांनी सांगितले की, या प्रकरणी येथील पसरत असलेल्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुडतरी आरोग्य केंद्राला काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.

यापूर्वी या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया अशा रोगांचा फैलाव झाला होता. या भंगार अड्ड्यामुळे येथील गटारे तुंबली आहेत. येथील १०० मीटरच्या आत आयडीसीचे विभागीय कार्यालय आहे, त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. अशाने येथील स्थितीची पाहणी आरोग्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT