Fatorda  Dainik Gomantak
गोवा

Fatorda: डोंगरवाड्यात नाताळ सणाच्या मुहूर्तावर मलनि:स्‍सारण पाईपलाईन कामाचा श्रीगणेशा

Fatorda: फातोर्डा मतदारसंघात 100 टक्के मलनि:स्‍सारण जोडणीचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

Fatorda: डोंगरवाडा-मडगाव नगरपालिकेचा प्रभाग 2 मधील 120 मीटर लांबीची मलनि:स्‍सारण पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ काल नाताळ सणाच्या दिवशी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला. फातोर्डा मतदारसंघात जवळजवळ सर्वच भागात मलनि:स्‍सारण पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण होत आलेले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर फातोर्डा हा 100 टक्के सिवरेज जोडणी घेतलेला मतदारसंघ ठरेल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी माजी नगराध्यक्ष लिंडन परेरा, मलनि:स्‍सारण खात्याचे अधिकारी, कंत्राटदार व ग्रामस्‍थ उपस्‍थित होते. आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, 2016-17 पासून या भागात सिवरेज पाईपलाईन टाकण्याचा आमचा प्रयत्न होता. पण या ना त्या कारणामुळे हे काम पूर्ण करता आले नव्‍हते. आता सरकारतर्फे येथे पाईपलाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

पुढील पंधरा दिवसांत या कामासाठी निवडलेले कंत्राटदार भालचंद्र वारक हे कामाला सुरवात करणार आहेत व एका महिन्यात काम पूर्ण केले जाईल. पावसाळ्यापूर्वी येथे डांबरीकरण रस्ता तयार करुन देण्यात येईल, असेही ते म्‍हणाले.या मलनि:स्‍सारण पाईपलाईनमुळे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घरांना जोडणी मिळणार आहे.

विजय सरदेसाई, फातोर्ड्याचे आमदार-

फातोर्डा मतदारसंघात जवळजवळ सर्वच भागात मलनि:स्‍सारण पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण होत आलेले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर फातोर्डा हा 100 टक्के सिवरेज जोडणी घेतलेला मतदारसंघ ठरेल. या पाईपलाईनमुळे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घरांना जोडणी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT