Arrest Dainik Gomantak
गोवा

Fatorda Crime: कॅफेत बोलावून मागितली 2 कोटी खंडणी, 'वॉल्टर'सह तीनजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

Fatorda Extortion Case: फातोर्ड्यातील बिल्डरला धमकी देऊन दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अटक केलेल्या खंडणीखोर वॉल्टर व त्याच्या तीन साथीदारांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: फातोर्ड्यातील एका बिल्डरला धमकी देऊन दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अटक केलेल्या खंडणीखोर वॉल्टर फर्नांडिस  व त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

संशयितांच्या पोलिस रिमांडची  मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले असता, तीन दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

वॉल्टरसह  रोहित (काटू ) फळदेसाई, तिरुपती वरकुरी व विनोदकुमार थोतड  अशी या संशयितांची नावे आहेत. श्रीनिवास थोरवत हे तक्रारदार आहेत. त्याला संशयितांनी घोगळ येथील एका कॅफेमधील बोलावून वॉल्टरच्या नावाची धमकी देऊन दोन कोटींची खडंणीची मागणी केली होती.

मागाहून  या प्रकरणी थोरवत  यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर संशयितांना अटक केली होती. वॉल्टर याच्याकडून  पोलिसांनी एक पिस्तूल आणि गोळ्याही जप्त केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT