murder case dainikgomantak
गोवा

मुलाने रागातून केलेल्या मारहाणीत वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

लग्नासाठी सोयरिक जुळवत नसल्याच्या मुलाने रागातून केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

तळपणवाडा : लग्नासाठी सोयरिक जुळवत नाही म्हणून चिडलेल्या मुलाने वडिलांशी भांडण उकरून काढले. त्यानंतर वडिलांना मारहाण केली. त्यात वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळपणवाडा - शिरोडा येथे आज बुधवारी घडली. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. (Father dies after being beaten by son)

याबाबत फोंडा पोलिसांकडून (Fonda police) मिळालेली माहिती अशी की, तळपणवाडा - शिरोडा येथील राजेश गणेश गावकर याचे लग्नासाठी सोयरिक जुळवत नव्हते. यामुळे सतत चिडलेला असायचा. राजेश याने वडील (Father) गणेश राघोबा गावकर याच्याशी लग्नावरून (married) भांडण उकरून काढले. त्यानंतर शब्दास शब्दास वाढल्यानंतर राजेश याने जवळच असलेली लोखंडी पहारीने वडिलांच्या डोक्यात हाणली. एवढ्याने समाधान न झालेल्या गणेशने हाताला सापडलेला जमिनीच्या टाईल्सचा तुकडा वडिलांच्या डोक्यावर मारला. यामुळे गणेश गावकर रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले.

त्यानंतर त्यांना सुरवातीला मडगाव हॉस्पिसियो इस्पितळ (Madgaon Hospice Hospital) व नंतर बांबोळी इस्पितळात (Bamboli Hospital) पुढील उपचारासाठी दाखल केले. पण तेथे गणेश गावकर यांचे संध्याकाळी निधन झाले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी (Fonda police) खुनाचा (murder) गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT