Fr Bolmax Pereira Dainik Gomantak
गोवा

Fr Bolxam Pareira: फादर बोलमॅक्स परेरा यांना दिलासा नाही; न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारला

उद्या सुनावणी

Akshay Nirmale

Fr Bolxam Pareira: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चिखली येथील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात वास्को पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर शनिवारी बोलमॅक्स यांनी जामिनासाठी मडगाव जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, आज सोमवारी मडगाव जिल्हा न्यायालयाने त्यांना अंतरिम जामिन नाकारला.

फादर बोलमॅक्स यांच्या अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी वास्को पोलिसांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे याबाबत सुनावणी आज स्थगित करण्यात आली असून उद्या याबाबत सुनावणी होणार आहे.

बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यावर त्यावरून वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत पण ते देव नाहीत. हिंदुंनी त्यांना देव बनवले आहे. असे परेरा यांनी म्हटले होते. त्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला आक्षेप घेतला होता.

परेरा यांनी नंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे सांगत माफीही मागितली होती. तथापि, आक्रमक हिंदु जमाव वास्को पोलिस स्टेशनबाहेर जमा झाला होता. त्यांनी फादर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. त्यानंतर वास्को पोलिसांनी परेरा यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT