Goa assembly monsoon session 2023 | Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

'गोवा 'ती' अ‍ॅसिड टेस्ट पास झाला', ... म्हणून आमदार सरदेसाईंनी गोंयकाराच्या एकीचे केले कौतुक

बोलमॅक्स यांनी अटक टाळण्यासाठी मडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

Pramod Yadav

Goa Assembly Monsoon Session 2023: शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिस्ती धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बोलमॅक्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन केले होते.

बोलमॅक्स यांनी अटक टाळण्यासाठी मडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने परेरा यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी आमदार सरदेसाई यांनी विधानसभेत गोंयकरांच्या एकीचे आणि गृह खात्याचे आभार मानले.

काय म्हणाले आमदार विजय सरदेसाई?

"दुपारी एक बातमी समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी फादर परेरा यांना जामीन मंजूर झाला. याबाबत गोव्यातील जनतेचे आणि गृहखात्याचे आभार मानले पाहिजेत. मागील काळात राज्यात निर्माण झालेली परिस्थिती गोव्याच्या एकीसाठी अ‍ॅसिड टेस्ट ठरली होती. गोवा ती टेस्ट पास झाला आहे."

गृह खात्याने देखील यात कोणताही हस्तक्षेप केला नाही त्याबाबत गृह खात्याचे आभार. असे विजय सरदेसाई म्हणाले.

शुक्रवारी रात्री वास्को पोलीस ठाण्यासमोर निदर्शेने केली. फादर बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवप्रेमींनी लावून धरली.

त्यानंतर रात्री उशीरा फादर परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी बोलमॅक्स यांनी जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाकडून परेरा यांना दिलासा मिळाला आहे. परेरा यांना बाँड व हमीदाराच्या अटीशर्तीवर मडगाव सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT