Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! बापातला राक्षस जागा झाला, सहा वर्षीय मुलीचा दांडकाने बडवून जीव घेतला

Margao Crime News: सलीमने दांडकाने बडवून आपल्याच सहा वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

Pramod Yadav

मडगाव: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच पोटच्या सहा वर्षीय मुलीचा जीव घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गोव्यात वास्तव्यास असलेला हा व्यक्ती मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फरार आहे.

सलीम दंभाळ (वय २८, रा. माकाझन, मूळ गडाक, कर्नाटक) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सलीमने दांडकाने बडवून आपल्याच सहा वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. सानिका दंभाळ असे या सहा वर्षीय मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, संशयित सलीमची सहा वर्षीय मुलीने कोणत्यातरी वस्तूसाठी आईकडे हट्ट धरला होता. याचवेळी मद्यपान करुन आलेल्या सलीमने दांडक्याने मुलगी सानिकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात सानिकाच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला.

यानंतर संशयित सलीमने घटनास्थळावरुन पळ काढला. मायना कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिस फरार सलीमचा शोध घेतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT