Fatal accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात; दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी

मोले राष्ट्रीय महामार्ग व शिवोली येथे दुचाकींचा अपघात

Rajat Sawant

गोव्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे प्रमाण 2022 च्या तुलनेत 2023 सुरू झाल्यापासून जास्त आहे. पोलिस यंत्रणा या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान आज राज्यात दुचाकीस्वारांचे दोन वेगवेगळे अपघात झाल्याची घटना समोर येत आहे.

मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व टेंपो यांच्यात अपघात झाला. तर गणेशपुरी मार्ना येथे खोदलेल्या खड्ड्यामुळे दुसरा अपघात झाला. या अपघातात दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोले येथील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणावर दुचाकी व टेंपो यांच्यात अपघाता झाला. अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात दुचाकीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

गंभीर जखमी दुचाकीस्वाराला रुग्णवाहीकेतुन उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. शॅनॉन अल्वारीस (21) असे जखमी युवकाचे नाव आहे. अपघाताचा कुळे पोलिसांनी पंचनामा केला आहे. कुळे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दुसरा अपघात हा शिवोली गणेशपुरी मार्ना रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यामुळे घडला. अपघातात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. रस्ता खोदाईच्या कामाचा इशारा देणारे कोणतेही फलक ठेकेदाराने लावलेले नाहीत त्यामुळे अपघात घडत असल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

Asian Games Semi Final 2026: शेफालीचं धडाकेबाज शतक, दीप्ती-नंदनीचा घातक मारा! बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक; गोल्डसाठी श्रीलंकेशी भिडणार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? तज्ज्ञांच्या विविध पर्यायांवर चर्चा, अंतिम निर्णय

Houthi Saudi Conflict: सौदी अरेबियानंतर कुणाचा नंबर? हूतींच्या धमकीमुळे पाकिस्तान-तुर्कीच्या गोटात घबराट; म्हणाले, ''परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!" VIDEO

Goa Political Satire: 'देव दिता आनी देवचार नाडटा'; गणपतीसमोर पाच दिवस भक्ती केली, पण चौथ्याच दिवशी 'पणती'ने घात केला!

SCROLL FOR NEXT