Parra Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Parra Fatal Accident: पर्रा-साळगाव रोडवर दुचाकीचा अपघात; चालक जागीच ठार

डोळा लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याबाजूला असलेल्या गटारात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Kavya Powar

Parra Fatal Accident: राज्यात अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नावच घेत नाही. सध्या गोव्यातील वाढते अपघात हे चिंतेचे कारण बनले आहे. आज पर्रा - साळगाव रस्त्यावर झालेल्या स्वयंअपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

आज (20 सप्टेंबर) पर्रा - साळगाव रोडवर एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यालगतच्या गटारात जाऊन कोसळली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ताहिर खान (28, खोर्ली, म्हापसा) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी 5 वाजता हा अपघात घडला आहे.

ताहिर सांगोल्डामध्ये कामाला असून तो सकाळी घरी परतत असताना ही घटना घडली. डोळा लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याबाजूला असलेल्या गटारात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT