Goa Accidents Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents : खांडेपार येथे भीषण अपघात, एकजण जखमी

गोव्यातील रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहतूक पोलीस विभाग, गोवा पोलीस आणि सरकार सतर्क असूनही गोव्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस वाहनचालकांवर कारवाईत करत दंड वसूल करत आहेत. खांडेपार येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात घडल्याचे वृत्त हाती आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खांडेपार उड्डाणपुलाच्या सकाळी ८ च्या सुमारास खाली दूध व्हॅन टेम्पो आणि मारुती व्हॅनमध्ये अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली असून तिला फोंडा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक खात्यामार्फत सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना लगाम बसत आहे. वेगमर्यादा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक सीसीटीव्हीत टिपून पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. तरीही रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT