Agriculture Dainik Gomantak
गोवा

Agriculture News : सरकारी नोकरी करून फुलविली शेती; आता देतात 100 कामगारांना रोजगार

Agriculture News : केपेच्या चंद्रहास फळदेसाईंचा उत्साह दांडगा : शंभर कामगारांना रोजगार

गोमन्तक डिजिटल टीम

श्यामकांत नाईक

Agriculture News : केपे, काही तरुण आपली स्वतःची शेतजमीन असूनही सरकारी नोकरीच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवतात. मात्र, काही लोक स्वतःला शेती व्यवसायात गुंतवून ठेवतात व महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करतात.

असेच केपे भागातील चंद्रहास कृष्णा फळदेसाई (७४) हे ज्येष्ठ नागरिक गेल्या ४७ वर्षांपासून शेती व्यवसायात असून त्यातून ते सध्या एका महिन्यात सुमारे दहा लाख रुपये कमावतात.

चंद्रहास फळदेसाई हे बीएससी ॲग्रीकल्चर पदवीधर आहेत. आपल्या केपे भागात असलेल्या सोळा हजार चौरस मीटर जमिनीत नारळ, नीरफणस, सुपारी, जायफळ अशा अनेक झाडांची लागवड केल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

आपण तीस वर्षे गोवा स्टेट बँकेत नोकरी केली असून वीस वर्षे कृषी अधिकारी म्हणून आपली सेवा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरी करीत असताना आपल्या जमिनीत कृषी लागवड करण्यापासून कधीच माघार घेतली नाही.

बागायतीत असलेल्या झाडांच्या सहवासात राहणे आपल्याला पसंत असून सुमारे शंभर कामगार या बागायतीत कामाला आहेत. या लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही यातून आर्थिक साहाय्य मिळते. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनेक योजना मार्गी लावल्या आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

१९७७ पासून मी कृषी क्षेत्रात कार्यरत असून आपल्या बागायतीत दोन हजार सुपारीची झाडे, साडेचारशे माड, शंभर जायफळाची झाडे तशीच नीरफणस व इतर प्रकारची झाडे आहेत. कृषी अधिकारी म्हणून काम करताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सरकारी योजना मिळवून दिल्या.

- चंद्रहास फळदेसाई, निवृत्त कृषी अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT