Goa Mining Problems Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: नोकऱ्या द्या, मग खाणी सुरू करा! डिचोलीतील बैठकीत शेतकऱ्यांची मागणी

Bicholim Mining Problem: खाण व्यवसायामुळे मयेतील शेती व्यवसाय संकटात आला आहे. शेतीतील गाळ काढून त्या सुपीक कराव्यात. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Sameer Panditrao

Farmers Meeting Over Mining Dispute Bicholim

डिचोली: शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, स्थानिकांना नोकऱ्या द्या, मगच खाण व्यवसाय सुरू करा, अशी मागणी खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांसह मयेतील ग्रामस्थांनी आज डिचोलीतील शासकीय बैठकीत केली.

खाण व्यवसायामुळे मयेतील शेती व्यवसाय संकटात आला आहे. शेतीतील गाळ काढून त्या सुपीक कराव्यात. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मुळाक खाजन, पांगर खाजन, किसान सभा आदी संघटनेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वाश्रमीच्या चौगुले खाण कंपनीकडून २०१३ पासूनची नुकसान भरपाई मिळालेली नाही.

नुकसान भरपाईचा हा प्रश्न विनाविलंब जाग्यावर घाला, अशी मागणी किसान सभेचे कृष्णा गडेकर, मुळाक खाजन संघटनेचे सखाराम पेडणेकर यांच्यासह विश्वास चोडणकर आदी शेतकऱ्यांनी केली.

खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही. मात्र प्रमुख प्रश्न सुटलेच पाहिजेत. घरी बसण्याची पाळी आलेल्या पूर्वाश्रमीच्या चौगुले कंपनीच्या कामगारांना त्यांची थकबाकी मिळावी. या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घ्यावे. या मागण्या या बैठकीत पुढे आल्या.

खाणीवर कंत्राटी पद्धत नकोच. अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. रमेश माईणकर, माजी सरपंच तुळशीदास चोडणकर, विजय पोळे आदींनी हे मुद्दे बैठकीत मांडले. स्थानिक ट्रकांना काम द्यावे. रोजगाराबाबतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी सरपंच कृष्णा चोडणकर यांनी केली.

जनतेचे प्रश्न सोडवा

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी शेतकरी, ट्रकमालक, कामगार यांची कैफियत जाणून घेतली. लोकांनी बैठकीत मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेण्यास झालेल्या दुर्लक्षामुळे आमदार शेट यांनी कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. गावातील शेतकरी, कामगार, ट्रकमालक आदी अवलंबित घटकांच्या मागण्यांवर खाण कंपनीने गंभीरपणे विचार करावा. खाण सुरू करण्यापूर्वी जनतेचे प्रश्न जाग्यावर घाला. असे आमदारांनी कंपनीच्या प्रतिनिधींना स्पष्टपणे सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT