farmer ready for farming 50 percent dainik gomantak
गोवा

Goa News : बळीराजा ‘रब्बी’ शेतीसाठी सज्ज

भाजी, मिरचीची लागवड : बियाण्यांवर मिळतेय 50 टक्के सवलत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : यंदा राज्यात ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटपर्यंत पडलेल्‍या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. ऐन तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. डिचोली, सत्तरी, काणकोण, सांगे आदी भागात कापण्यास तयार झालेली भातशेती अक्षरश: आडवी झाली. असे असूनही आता रब्बी हंगामात दोन पैसे मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी नव्या जोमाने लागवड करणे सुरू केले आहे.

कृषी संचालनालयाकडून राज्य कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. राज्यातील शेतकऱ्यांना भाजी-बियाणे ५० टक्के सवलतीच्या दरात देण्यात येते. तसेच कीटकनाशकेही सवलतीच्या दरात पुरविली जातात. नवयुवकांना, प्रशिक्षण देखील देण्यात येते.

भाजीपाल्‍यावर जास्‍त भर

सध्‍या शेतकरी भाजी व मिरची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत करत आहेत. काही ठिकाणी बीज पेरणी होऊन पिकांना अंकुर देखील फुटले आहेत. लालभाजी, मुळा, वांगी, चिटकी, भेंडी आदी पिके रूजली असून मिरचीच्या रोपांसाठी रूजवण घालणे सुरू झाले. रब्बी हंगामासाठी लागणारे बियाणे व इतर अवजारे बाजारात विकत घेण्यासाठी गर्दी होत आहे. ताळगावात प्रसिद्ध कणग्याची लागवड सुरू आहे. काही ठिकाणी लागवड पूर्ण झालेली आहे. अनेक शेतकरी कणग्या लागवडीसाठी मशागत करताहेत.

भाजीपाल्याची विविध बीजे कृषी खात्याकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना ती ५० टक्के सवलतीच्या दरात दिली जातात. तसेच सेंद्रिय कीटकनाशकेही सवलतीच्या दरात पुरविली जातात.

- नेविल आल्फोन्सो,कृषी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT