Mopa Farmer Protest Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोडचे काम शेतकऱ्यांनी रोखले

कंपनी अधिकाऱ्यांशी संघटनेची चर्चा, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

दैनिक गोमन्तक

पेडणे : वारखंड - नागझर ग्रामपंचायतीने काम बंद करण्याची नोटीस बजावली असताना नागझर भागात मोपा प्रकल्प जोड रस्त्याचे काम मोठ्या जोमाने सुरू होते.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तुळस्करवाडी येथे मोपा लिंक रोड प्रकल्पाचे काम रोखले. यावेळी मोपा विमानतळ पंचक्रोशी जन संघटनेचे अध्यक्ष प्रा. भारत बागकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे सदस्य आणि त्रस्त ग्रामस्थांनी कंपनीचे अधिकारी आर.के. सिन्हा यांच्याशी चर्चा करून काम बंद केले. यावेळी पेडणे पोलिस उपस्थित होते.

तुळस्करवाडी येथील तसेच मोपा जोड रस्ता आणि धारगळ ते नागझर येथील काम सुरू करण्यात आले.ही माहिती मिळताच ज्या लोकांच्या काजू गेल्या ते लोक जमा होऊन नागझर येथील काम पोलिसांच्या उपस्थितीत बंद पाडले. रस्त्यावर भलेमोठे दगड टाकून वाहतूक बंद करण्यात आली. जोपर्यंत काम बंद होत नाही, तोवर आंदोलन (Protest) सुरूच राहिल,असा इशारा मोपा प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, वारखंड - नागझरचे सरपंच संजय तुळस्कर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपनिरीक्षक बाबुराव देसाई आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीचे अभियंता आर. के. सिन्हा यांच्याशी कामाबाबत चर्चा केली. कंपनीने चालवलेले काम कायदेशीर असल्यास तशी कागदपत्रे दाखवा, अन्यथा तोवर काम बंद ठेवा, अशी सूचना सरपंच संजय तुळस्कर यांनी केली. त्यावर बांधकाम खात्याकडून उत्तर मिळत नाही,तोवर काम बंद ठेवण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले.

मोपा विमानतळासाठी धारगळ राष्ट्रीय महामार्ग 66 ते मोपा विमानतळापर्यंत 1200 कोटी रुपये खर्च करुन लिंक रोड करण्याची योजना राष्ट्रीय महामार्ग रस्ते विभागाने आखली असून त्याला मंजुरीही मिळाली आहे. पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोपा लिंक रोडसाठी रस्त्याचा आरखडा सुचवला होता.

स्व.पर्रीकर यांनी सुचवलेल्या आराखड्यानुसार कुणाचीच घरे किंवा झाडे बागायती जात नव्हत्या, त्याला बगल देत विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बागायतीवर डोळा ठेवून निसर्गाचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून रस्ता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT