Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवाचे प्रशिक्षक पेनया यांना निरोप

लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा अपेक्षित आहे

गोमन्तक डिजिटल टीम

संजय पेटकर

Indian Super League इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी आणि सुपर कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यास अपयश आलेल्या एफसी गोवा संघाने रविवारी मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया, त्यांचे कोचिंग स्टाफ सहकारी गोर्का ॲझकोर्रा, एदुआर्द कार्रेरा व जोएल डोनेस यांना निरोप दिला.

आगामी मोसमात एफसी गोवा संघ नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणार असून लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा अपेक्षित आहे.

हैदराबाद एफसीचे मानोलो मार्केझ यांच्याकडे एफसी गोवाची सूत्रे सोपविण्याची माहिती आहे. स्पेनच्या पेनया यांनी 2022-23 मोसमाच्या सुरवातीस एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यापूर्वी ते संघातर्फे खेळाडू या नात्याने खेळले होते.

पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाला आयएसएल स्पर्धेत सातवा क्रमांक मिळाला, तर सुपर कप स्पर्धेत ते गट ‘क’मध्ये दुसऱ्या स्थानी राहिले.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी पेनया आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील सहकाऱ्यांना निरोप देताना भावी कारकिर्दीसाठी सुयश चिंतिले.

त्यांनी संघाचा विकास व प्रगतीसाठी समर्पित भावनेने खूप मेहनत घेतली, पण अपेक्षित निकालांची साथ लाभली नाही, असे रवी यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT