Famous Shantadurga temple closed again
Famous Shantadurga temple closed again 
गोवा

कवळे प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिर पुन्हा बंद!

दैनिक गोमन्तक

फोंडा: गेले दोन महिने आटोक्‍यात असलेला फोंडा तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता वाढू लागला असून हिवाळ्याची सुरवात आणि पर्यटकांची वाढलेली संख्या यामुळे राज्यभरातील कोरोनाग्रस्तांच्या या वाढू लागलेल्या आकड्यावरून भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवारी) कवळे येथील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. कवळे शांतादुर्गा मंदिर परिसरात सातजण कोरोनाबाधित सापडले असून मंदिरातील पाच सेवेकरी कोरोनाग्रस्त झाल्याने मंदिर व्यवस्थापनाने हा तातडीने निर्णय घेतला.


कवळे येथील मंदिराच्या सेवेकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची कोरोना तपासणी करण्यात आली असून अजून अहवाल येणे अपेक्षित आहे. कवळे शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी चार दिवसांपूर्वी सात बसगाड्यांतून महाराष्ट्र व इतर राज्यातील पर्यटक आले होते, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या पर्यटकांमुळेच हा कोरोना पसरला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


फोंडा तालुक्‍यातील मंदिरे खुली झाली असली तरी काही मंदिरात मात्र अजूनही श्रीच्या मुखदर्शनाची सोय आहे. तर काही मंदिर व्यवस्थापनांनी कोरोनासंबंधीचे सर्व नियम व अटी पाळूनच देवदर्शनाला भाविकांना मुभा दिली आहे. मागच्या काळात रामनाथी येथील रामनाथ मंदिरातील सेवेकरी पुजारी कोरोनाग्रस्त झाल्याने हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. आता कवळेतील शांतादुर्गा मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर व मंदिर परिसर पूर्णपणे सॅनिटाईझ करण्यात आला आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT