Falling of trees due to rains in goa  Dainik Gomantak
गोवा

पावसामुळे पेडण्यात झाडांची पडझड

आज सकाळपासून पावसामुळे मोठं मोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांची बरीच धावपळ झाली.

दैनिक गोमन्तक

Goa Rain Update : आज सकाळपासून पावसामुळे मोठं मोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांची बरीच धावपळ झाली. एका बाजूने मोठा पाऊस व त्यात विजेची अत्याधुनिक सामुग्री व जीवाची भीतीचा याचा कसलाही दबाव न बाळगता जवानांनी मोठी कामगिरी केली. (Falling of trees due to rains in goa)

सकाळी सहाच्या सुमारास भूतवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने खोळंबा झाला, नंतर व्हायडोंगर रस्त्याचा मधोमध आंब्याचे झाड पडल्याने अग्निशामक दलाला बरीच कसरत करावी लागली.

नंतर खालचावाडा विर्नोडा येथे रुक्मिणी हरीजन यांच्या घरावर मोठे झाड पडल्याने जवानांनी घराला मोठे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली, आणि घरावरचे झाड सावधगिरीने कापून बाजूला केले. पावसामुळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली.

ही कामगिरी जवान अमोल परब ,रतन परब आणि विकास चौहान यांनी अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर व हवालदार फटू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. जवानांनी घराची तीन लाखाहून अधिक मालमत्ता वाचवली. याबाबत लोकांनी त्यांचे कौतुकही केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT