Goa Fertility Rate Dainik Gomantak
गोवा

Goa Fertility Rate: गोव्यासाठी धोक्याची घंटा, प्रजनन दरात लक्षणीय घट; मोफत IVF उपचार तारणार का?

गेल्या पाच वर्षांत गोव्याचा प्रजनन दर लक्षणीय घटला आहे.

Pramod Yadav

Goa Fertility Rate: गेल्या पाच वर्षांत गोव्याच्या प्रजनन दरात घट झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे किंवा NFHS-5 च्या आकडेवारीनुसार गोव्याचा एकूण प्रजनन दर 1.3 आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS) च्या मते, गेल्या पाच वर्षांत गोव्याचा प्रजनन दर लक्षणीय घटला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या 14,58,545 होती परंतु हॉवर्डच्या लोकसंख्या अंदाजानुसार 2020 मध्ये राज्याची लोकसंख्या 16.5 लाखांवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

आरोग्यावरील खर्चासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या 9.1 टक्के तरतूद करणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. 'पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च' या संशोधन संस्थेने याबाबत मत मांडले आहे.

प्रजनन दर सामान्यतः 2.1 असावा, तो 1.6 च्या खाली असल्यास चांगला मानला जात नाही. असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयआयपीएसच्या या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. NFHS-4 (2015-2016) च्या माहितीनुसार, भारताचा प्रजनन दर 2.2 होता, तो NFHS-5 (2019-2021) मध्ये 2.0 इतका कमी झाला.

बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर ही भारतातील सर्वात जास्त प्रजनन दर असलेली राज्ये आहेत, तर सिक्कीममध्ये सर्वात कमी म्हणजेच 1.1 प्रजनन दर आहे.

राज्यातील लोक अधिक शिक्षित आहेत, लहान कुटुंब धोरणाबाबत तसेच गर्भनिरोधकांच्या वापराबाबत लोक जागरुक आहेत. तसेच, राज्यात स्थलांतर देखील अधिक पाहायला मिळते. असे गोव्यातील कमी प्रजनन दर कमी असण्याचे कारण आयआयपीएस अधिकाऱ्याने बीबीसीला दिले आहे.

दरम्यान, अलिकडेच गोवा सरकारने पालक बनू इच्छिणाऱ्या जोडप्यांना मोफत IVF उपचार प्रदान करण्याची घोषणा केली आहे. अशी सुविधा देणारे गोवा पहिले राज्य ठरले आहे. गोमेकॉत IVF उपचारासाठी आत्तापर्यंत 100 जणांनी नोंदणी केल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बीबीसीला सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT