Fake Tantric Raped Minor in Goa Dainik Gomantak
गोवा

इच्छा पूर्ण करण्याच्या बहाण्याने बनावट तांत्रिकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

या सर्व प्रकरणात या तांत्रिकाशी अल्पवयीन मुलीच्या आईचे संगनमत असल्याचे आढळून आले. त्यानंतर आईलाही काल रात्री अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

जग इतके पुढे जाऊनही अद्याप असे काही लोक आहेत जे तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धा अशा गोष्टींमध्ये गुंतले आहेत. आणि या सगळ्यातूनच पुढे गुन्हेगारीला आमंत्रण मिळते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका बनावट तांत्रिकाला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. (Fake Tantric Raped Minor in Goa)

म्हापसा उपविभागाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तांत्रिकाने मुलीला तिच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. FIR नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी रमाकांत नाईक (बनावट बाबा, वय - 50 वर्ष, कान्सा, थिवी, बार्देश) याला अटक केली आहे.

या सर्व प्रकरणात या तांत्रिकाशी अल्पवयीन मुलीच्या आईचे संगनमत असल्याचे आढळून आले. त्यानंतर आईलाही काल रात्री अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कलम 376 आयपीसी, पॉक्सो कायद्याचे कलम 4 आणि गोवा चिल्ड्रन ऍक्टचे कलम 8(2), 2003 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT