Goa Police Bust Fake Call Center Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोव्यात बसून US च्या नागरिकांना गंडा; बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, सात जणांना अटक

Fake Call Center Busted: गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने कळंगुट येथील हॉटेलमध्ये छापा टाकत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.

Pramod Yadav

गोव्यात बसून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कळंगुट हॉटेलमधून सुरु असलेल्या या कॉल सेंटरवर पोलिसांच्या सायबर विभागाने कारवाई केली. पोलिसांनी सात जणांना अटक करत त्यांच्याकडून विविध साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने कळंगुट येथील हॉटेलमध्ये छापा टाकत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. येथून अमेरिकेतील नागरिकांची लोन कंपनी, अमेझॉन, बँक कर्मचारी तसेच सरकारी किंवा कायद्यासंबधित कर्मचारी असल्याचे सांगून फसवणूक करण्याचे उद्योग सुरु होते.

पोलिसांनी सात जणांना अटक करत त्यांच्याकडून लॅपटॉप, राऊटर, D-Link स्विच यासारख्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT