श्री देवी केळबाई देवस्थान Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘रेड्याची जत्रा’ होणार? केळबाई मंदिर खुले करण्याची मागणी

गेल्यावर्षीही ''रेड्याची जत्रा'' परंपरेप्रमाणे साजरी झाली नव्हती

दैनिक गोमन्तक डिजिटल

मये येथील श्री महामाया केळबाय पंचायतन देवस्थानची ''रेड्याची जत्रा'' अनिश्चिततेच्या सावटाखाली असून ही जत्रा होणार की नाही, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदा माल्याच्या जत्रेदिवशी ''माले'' पेटले नसल्याने आणि देवीचा ''पण''ही अपूर्ण राहिल्याने ही जत्रा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. गेल्यावर्षीही ''रेड्याची जत्रा'' परंपरेप्रमाणे साजरी झाली नव्हती.

वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले मये येथील श्री केळबाई देवीचे मंदिर अजूनही खुले करण्यात आलेले नाही. गेल्या तेरा दिवसांपासून देवी बंदिस्त आहे. हे मंदिर विनाविलंब खुले करावे, अशी मागणी भाविक करीत आहेत. हे मंदिर सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणीही होत आहे.

मंदिर खुले व्हावे आणि समस्त भाविकांना देवीचे दर्शन घडावे, अशी मागणी करीत नाईक गावकर गटातील महिलांनी ''नामजप''चा संकल्पही सुरू केला आहे. सध्या मंदिर बंद असल्याने देवी बंदिस्त आहे. पूजाअर्चेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. विविध विधी करणेही कठीण होत आहे. त्यामुळे भाविकांत ‘रेड्यांच्या जत्रे’बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

जत्रेचे वैशिष्ट्य

येत्या बुधवारी (ता.12) ही जत्रा साजरी करण्याचा दिवस आहे. परंपरेप्रमाणे जत्रेच्या दिवशी सायंकाळी माशेलहून श्री देवकीकृष्ण, श्री पिसो रवळनाथ आणि श्री पुरुष या देवतांच्या तरंगांचे मये गावात आगमन होत असते. नंतर मध्यरात्री रेड्याची जत्रा साजरी होत असते. दुसऱ्या दिवशी परंपरेप्रमाणे कौलोत्सव साजरा करून तिन्ही तरंगे माघारी जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT